तलासरीत नवोदित संघाच्या कबड्डी स्पर्धा संपन्न




तलासरीत नवोदित संघाच्या कबड्डी स्पर्धा संपन्न
तलासरी दि. १४(डॉ. दत्तात्रय शिंदे)
तंत्रज्ञानाच्या युगात विशेषतः तरुण पिढी मोबाईलवर गेम्स खेळण्यात गुंग असताना सालाबाद प्रमाणे यावर्षीही दि. १३ रोजी कुर्झे बोबीपाडा या ठिकाणी मातीशी व शारीरिक कौशल्याशी नातं सांगणाऱ्या( ६५ किलो वजनी गट पुरुष) कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचे आयोजन व नियोजन नवोदित संघ कुर्झे बोबीपाडा यांच्या वतीने करण्यात आले होते उद्घाटन प्रसंगी तलासरीचे नगराध्यक्ष सुरेश भोये, नगरसेवक नंदू हाडळ ,सरपंच
विजय भोये व उपसरपंच मारिया वाडू कुर्झे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी सुरू झालेल्या ह्या स्पर्धा कुडकुडत्या थंडीत पहाटे सुमारे सहाच्या सुमारास संपन्न झाल्या. सरीगांम( गुजरात), खानवेल (दादरा नगर), विक्रमगड, डहाणू अशा आसपासच्या परिसरातून सुमारे ३५ संघानी आपला सहभाग नोंदवून विजेतेपदासाठी आपलं कौशल्य पणाला लावलं आणि तितक्याच उत्साहाने गुलाबी थंडीत रात्रभर चाललेला या स्पर्धेचा प्रेक्षकांनीही आनंद लुटला.
फायनलच्या अटीतटीच्या सामन्यामध्ये नवोदित संघ कुर्झे बोबीपाडा विजेता तर परिवर्तन संघ तलासरी उपविजेता पदाचा मानकरी ठरला.तृतीय क्रमांकाचा मानकरी मोहबुद्रुक संघ ठरला. तर सामनावीर म्हणून बोबीपाडा संघाचा रुपेश काचरा चमकला.