Uncategorized

दानशूर करंदीकर कुटुंबीयांचे उदार सहकार्य।

दानशूर करंदीकर कुटुंबीयांचे उदार सहकार्य।

दांडेकर महाविद्यालयात विस्तारित विधी भवनाचे भूमिपूजन।

पालघर (प्रतिनिधी ): पालघर येथील सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या वतीने संचलित “आत्माराम जनार्दन करंदीकर विधी महाविद्यालय” तसेच वासुदेव आत्माराम करंदीकर पदव्युत्तर अध्ययन केंद्र यांच्या विस्तारित नव्या इमारतीचे भूमिपूजन रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी पारंपरिक विधी-विधान व पूजा-अर्चना करून उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी दानशूर करंदीकर कुटुंबीयांतील ॲड. प्रकाश वासुदेव करंदीकर, अजित वासुदेव करंदीकर, सौ. शुभांगी प्रकाश करंदीकर, शिशिर अजित करंदीकर आणि सौ. पूजा करंदीकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास करंदीकर कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी नव्या विस्तारित विधी इमारतीच्या उभारणीसाठी करंदीकर कुटुंबीयांनी दिलेल्या उदार आर्थिक सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. विधी शिक्षणाच्या क्षेत्रात करंदीकर कुटुंबीयांनी दिलेले हे मोलाचे योगदान अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी असून त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे श्री कोरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना श्री.कोरे म्हणाले की, नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील विधी शिक्षणाला नवी दिशा व बळ मिळणार असून अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी मिळणार आहे.
करंदीकर कुटुंबीयांच्या वतीने बोलताना ॲड. प्रकाश करंदीकर यांनी सांगितले की, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी ही संस्था अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. समाजातील सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पालघर परिसरातच उत्तम आणी दर्जेदार शिक्षण मिळावे आणि विशेषतः विधी शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने करंदीकर कुटुंबीयांनी नव्या विस्तारित विधी इमारतीच्या उभारणीसाठी आर्थिक सहकार्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त सोहनभाई बाफना, उपाध्यक्ष धनेशभाई वर्तक, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी व अनिल पाटील, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश संखे, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या पायल चोलेरा यांच्यासह अतुल दांडेकर, चंद्रकांत तिवारी, सुरेश जोशी, अमिता राऊत, हेमाळी राऊत, हितेंद्र शहा, सुधीर दांडेकर, भरत राऊत, योगेश म्हात्रे, दिनेश पाटील, रामप्रकाश निराला तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटील उपस्थित होते.
याशिवाय परिसरातील ज्येष्ठ वकील ॲड. दीपक सावले व ॲड. सुधीर गुप्ता, अनेक समाजसेवक तसेच मान्यवर नागरिकही मोठ्या संख्येने या भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थित होते.
श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात हा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button