Uncategorized

डॉ. दि. ज. गाळवणकर स्मारक विद्यामंदिर, अर्नाळा येथे सुलभ शौचालय सेवा प्रदान कार्यक्रम संपन्न .

अर्नाळा येथे सुलभ शौचालय सेवा प्रदान कार्यक्रम संपन्न.

अर्नाळा, ता. वसई —

आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या डॉ. दि. ज. गाळवणकर स्मारक विद्यामंदिर, अर्नाळा येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCF) च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) योजनेअंतर्गत आणि लायन्स सर्विस ट्रस्ट ऑफ वसई यांच्या संयुक्त विद्यमाने सुलभ शौचालय सेवा प्रदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी RCF कंपनीचे जी.एम. श्री. संजय पेटकर, तसेच विशेष अतिथी एम.जे.एफ. लायन डॉ. प्रशांत पाटील (माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), लायन्स क्लब चे अध्यक्ष एम जे एफ लायन डॉ अनिरुद्ध चव्हाण, लायन लिलाधर तळेले सर,लायन श्रद्धा मोरे , लायन भारती पवार, लायन अतुल दांडेकर, लायन अरुण चव्हाण, लायन मधु बागलकोट, लायन डॉ शंकर के टी, लायन आदित्य तळेले, लायन ओंकार पाटील, लायन योगेश कपूरिया, लायन adv शैला मानकर, लायन श्रेहास चूरी, लायन नितीन पुरकर व लायन रंजना म्हात्रे,RCF चे सीनियर मॅनेजर श्री. सचिन काकडेकर सीनियर मॅनेजर श्रीमती हर्षला शिंदे, तसेच लायन्स क्लब ऑफ वसई चे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

आ  वी. अर्.शिक्षण संस्थेचे कार्यवाह उत्तम पाटील साहेब, कार्यकारिणी सदस्या रजनी बगे मॅडम, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका  सौ. वैशाली चौधरी मॅडम तसेच इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका आनंदिता मॅडम यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि गणेश वंदना सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. वैशाली चौधरी यांनी सादर केले,  तर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि RCF तसेच लायन्स क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

RCF कंपनी व लायन्स क्लब ऑफ वसई यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही सुलभ शौचालय सेवा विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी व स्वच्छ वातावरण निर्माण करणारी ठरणार आहे.

शेवटी आभार प्रदर्शन इंग्रजी माध्यमाचे पर्यवेक्षक श्री तुषार वैती सर यांनी  केले.

जवळ पास २०० हुन अधिक विद्यार्थी (मुली व मुले) ह्या सुविधेचा लाभ घेतील 

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री योगेश पाटील सर यांनी केले.

संपूर्ण सोहळा उत्साह, आनंद आणि सामाजिक जाणीव यांच्या एकत्र संगमाने उजळून निघाला. 🌺

याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व तारपा नृत्य सादर केले.                         *PROUD TO BE A LION*.                                                 PST IST VP.                                    लायन्स क्लब ऑफ वसई २०२५-२६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button