Uncategorized

पालघर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन.

पालघर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन

पालघर (प्रतिनिधी)प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन हा कार्यक्रम नियोजित पद्धतीने राबविण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम आर्यन हायस्कूल, पालघर येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला. यामध्ये एकूण १७१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तसेच १०० शिक्षकांनी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत संचलन सादर केले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व राष्ट्रीय जाणीव निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी योजना शेषराव बडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अशा उपक्रमांचे शैक्षणिक व सामाजिक महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास संबंधित संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व नियोजनबद्धरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button