शहर
वाणगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा

7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीताच्या लेखनास 150 वर्षे पूर्ण होत आहेत; याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री जिव्या सोमा मशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगाव ता. डहाणू येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ते निवृत्त पर्यवेक्षक प्रा. संजय घरत हे होते. त्यांनी वंदे मातरम या गीताच्या लेखनास 150 वर्षाचा इतिहास सांगताना वंदे मातरम ची पार्श्वभूमी, वंदे मातरमचा अर्थ, वसुधैव कुटुंबकम, स्वतंत्र भारताचा ध्वज, आत्मनिर्भर भारत, वंदे मातरम प्रेरणेचा प्रवास, विकसित भारताची संकल्पना, स्वदेशी चळवळ अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.


