मतदान केंद्रात एकाच नावाच्या दोन महिलांमुळे कोलाहल!

मतदान केंद्रात एकाच नावाच्या दोन महिलांमुळे कोलाहल!
पालघर (प्रतिनिधी)पालघर | वॉर्ड क्र. १०— हॉलिस्पिट शाळेतील रूम क्रमांक 1 /2 मध्ये आज मतदानादरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला. एकाच नावाच्या दोन महिला मतदानासाठी आल्याने मतमोजणी यंत्रणा आणि अधिकारी पूर्णपणे अडचणीत सापडले.
घटनास्थळी आमच्या प्रतिनिधींनी मतदान केंद्रावरील PRO सुहास अंबुरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार—
🔹 सकाळी आलेल्या पहिल्या महिलांचा फोटो मतदार यादीशी मॅच झाल्याने त्या मतदान करून गेल्या.
🔹 त्यानंतर त्याच नावाच्या दुसऱ्या महिला हजर झाल्या. त्यांचे ओळखपत्र व माहिती संपूर्णपणे बरोबर असूनही फोटो मॅच न झाल्याने त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले.
यामुळे खऱ्या मतदाराला तिच्या लोकशाही हक्कापासून वंचित रहावे लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे, आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मतदार यादीतील त्रुटी, फोटो अपडेटमध्ये झालेल्या चुका आणि पडताळणी प्रक्रियेतील शिथिलता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिकांकडून निवडणूक आयोगाकडे मागणी—
✔ तातडीची चौकशी
✔ चुकीची नोंद दुरुस्त करणे
✔ आणि खऱ्या मतदाराला मतदानाचा अधिकार परत मिळवून देणे
ही घटना आता वॉर्डभर चर्चेचा विषय ठरली असून, मतदान केंद्रातील व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
— दिग्गज वार्ताहर_