भारत डिजिटल युगाकडे वाटचाल करीत आहे, या अनुषंगाने पालघर, आर्यन शाळेच्या विद्यार्थ्यांनीही रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिझम आदी शिकले पाहिजे- श्री. केदार काळे

भारत डिजिटल युगाकडे वाटचाल करीत आहे, या अनुषंगाने पालघर, आर्यन शाळेच्या विद्यार्थ्यांनीही रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिझम आदी शिकले पाहिजे- श्री. केदार काळे
१० डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) भारत डिजिटल युगाकडे वाटचाल करीत, आपला भारत देश डिजिटल होते, देशात चौथी औद्योगिक क्रांती हि सुरू आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात वाढवणं बंदर, जिंदाल जेटी, बुलेट ट्रेन, बडोदा हायवे, एअरपोर्ट सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प येणार आहेत. तर काही ठिकाणी या प्रकल्पाच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. पालघर जिल्ह्यात विकासाची गंगा वाहू लागली आहे. अशा वेळी स्थानिक विद्यार्थ्यांनाही रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक, डी कोडींग, मेकॅनिझम आदी सर्व काही शिकणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
या अनुषंगाने दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी, आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या पालघर येथील इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये, रोबोटिक्स जागरूकता आणि प्रात्यक्षिक सत्र आयोजित केले होते. तेव्हा संस्थेचे प्रेसिडेंट श्री. केदार काळे मार्गदर्शन करताना म्हणाले की” आपला भारत डिजिटल होत आहे, चौथी औद्योगिक क्रांती सुरू आहे, पालघर जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. विकासाची गंगा वाहू लागली आहे.अशा वेळेस आपल्या विद्यार्थ्यांनाही रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक, डी कोडींग मेकॅनिझम हे सर्व शिकवणे गरजेचे आहे , तरच भविष्यात त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी शिक्षण क्षेत्रातील ९५ वर्षांपासून शैक्षणिक कार्य करणारी आर्यन एज्युकेशन सोसायटी मुंबई आणि पालघर शाळांमध्ये शैक्षणिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असते. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात रोबोटिक जागृती आणि प्रात्यक्षिक सत्र इंग्लिश मीडियम च्या शाळेने आयोजित केले आहे. त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा. यासाठी पालक सभा घेऊन पुढील वर्षाच्या शैक्षणिक सत्रापासून, अभ्यासक्रमात हा विषय घेण्याबद्दल चर्चा करण्यात येईल. व पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यात येईल. तसेच म.नी. दांडेकर हायस्कूल येथेही, डी कोडींग शिकविले जात आहे.
या कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री कमलेश वारया, मुख्याध्यापक सौ सोनार, स्कूल कमिटी सदस्य श्री किरण पाटील, आदी सह शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.