Uncategorized

माजी नगराध्यक्षा उज्ज्वला काळे सातव्यांदा नगरसेवकपदी
शिवसेना शिंदे गटातून पुन्हा विश्वासार्ह विजय

माजी नगराध्यक्षा उज्ज्वला काळे सातव्यांदा नगरसेवकपदी
शिवसेना शिंदे गटातून पुन्हा विश्वासार्ह विजय
पालघर,(प्रतिनिधी) दि. —२१ : पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी नगराध्यक्षा उज्ज्वला काळे यांनी शिवसेना (शिंदे गट) तर्फे पुन्हा एकदा विजय मिळवत सातव्यांदा नगरसेवकपदावर निवडून येण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या विजयामुळे त्यांच्या कार्यकाळातील अनुभव व जनविश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
प्रभागातून झालेल्या चुरशीच्या लढतीत उज्ज्वला काळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत मतदारांचा स्पष्ट कौल मिळवला. माजी नगराध्यक्षा म्हणून केलेली विकासकामे, नागरिकांशी थेट संवाद आणि सातत्यपूर्ण उपस्थिती याचा लाभ त्यांना या निवडणुकीत झाल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
विजयानंतर समर्थकांनी फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. प्रतिक्रिया देताना उज्ज्वला काळे यांनी पालघर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रभागातील मूलभूत सुविधा, महिला प्रश्न, स्वच्छता व नागरी सोयीसुविधांवर अधिक भर देऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या विजयामुळे पालघर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवसंपन्न नेतृत्वाची भूमिका उज्ज्वला काळे बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button