पालघर नगर परिषद निवडणूक निकाल जाहीर
उत्तम घरत नगराध्यक्षपदी विराजमान
पालघर नगर परिषद निवडणूक निकाल जाहीर
उत्तम घरत नगराध्यक्षपदी विराजमान
पालघर, (प्रतिनिधी)दि. — :२१/१२/२५ पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून नगराध्यक्षपदी उत्तम घरत यांची निवड झाली आहे. एकूण १५ वॉर्डमधील ३० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून शिवसेनेने (SS) सर्वाधिक जागा जिंकत नगर परिषदेवर बहुमत मिळवले आहे.
निवडणूक निकालानुसार शिवसेनेने बहुसंख्य वॉर्डमध्ये विजय मिळवला असून भाजप (BJP) व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (UBT) यांनाही काही वॉर्डमध्ये यश मिळाले आहे.
वॉर्ड १ अ मधून प्रियंका राजेंद्र (बंड्या) म्हात्रे (SS) तर १ ब मधून अरिफ कलाडिया (UBT) विजयी झाले. वॉर्ड २ अ व २ ब मधून मोना मिश्रा व भारती धोत्रे (BJP) यांनी विजय मिळवला. वॉर्ड ३ अ मधून महेश कोती (SS) तर ३ ब मधून कृपा मोरे (BJP) निवडून आल्या.
वॉर्ड ४ अ आनंद राऊत व ४ ब प्रीती मोरे (SS), वॉर्ड ५ अ राजेंद्र पाटील व ५ ब पुष्पा जैन (SS), वॉर्ड ६ अ प्रगती म्हात्रे व ६ ब रईस खान (SS) यांनी विजय संपादन केला.
वॉर्ड ७ अ ज्योती जाधव (SS) व ७ ब मुनाफ मेमन (BJP), वॉर्ड ८ अ राधा मानकामे व ८ ब राहुल पाटील (UBT), वॉर्ड ९ अ मेघा आघाव व ९ ब अमोल पाटील (SS) विजयी झाले.
वॉर्ड १० अ विभूती चंपानेरकर व १० ब नीलम संखे (SS), वॉर्ड ११ अ सोनाली शिंदे व ११ ब भावानंद संखे (BJP), वॉर्ड १२ अ अमिश पिंपळे (BJP) व १२ ब उज्ज्वला काळे (SS) यांनी यश मिळवले.
वॉर्ड १३ अ चंद्रशेखर वडे व १३ ब शिल्पा वाजपेयी (SS), वॉर्ड १४ अ दिनेश घरत व १४ ब गीतांजली माने (SS) तसेच वॉर्ड १५ अ माधुरी सापाटे व १५ ब जश्विन घरत (SS) निवडून आले.
निकाल जाहीर होताच शहरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. नव्या नगर परिषदेपुढे शहर विकास, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी सुविधा सुधारण्याचे मोठे आव्हान असणार आहे.