श्री कुलस्वामी रेणुका माता मंदिर, दापोली येथे पाचवा वर्धापन दिन सोहळा येत्या शुक्रवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

पालघर (प्रतिनिधी)श्री कुलस्वामी रेणुका माता मंदिर, दापोली येथे पाचवा वर्धापन दिन सोहळा येत्या शुक्रवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 9 वाजता गणेश पूजन, 10 वाजता पुण्याहवाचन व स्थापित देवतांचे पूजन, त्यानंतर श्री रेणुका दिव्य माता अभिषेक, ग्रहशांती, हवन, पूर्णाहुती, नैवेद्य, तसेच महाआरती व महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
हा पवित्र सोहळा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आला असून ट्रस्टचे डॉ. कमलाकर संखे (अध्यक्ष), हेमंत संखे (सचिव), वैभव संखे (खजिनदार), नीलकंठ संखे (उपाध्यक्ष), संतोष संखे (उपाध्यक्ष) व गणेश संखे (सहखजिनदार) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.