Uncategorized

कैलासनगर वळपाडा जिल्हा परिषद शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!

कैलासनगर वळपाडा जिल्हा परिषद शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!
भिवंडी(स्व.रा.तो)
भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कैलासनगर वळपाडा येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ध्वजारोहण करण्याचा मान दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांना देण्यात आला.
हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक श्री. नाऊ मारूती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमास भिवंडी महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका तथा माजी सरपंच सौ. गीता विठोबा नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. संदीप मनोहर पाटील, श्री. दिपक हनुमान पाटील, माजी उपसरपंच सौ. वनिता अनिल पाटील, प्रसिद्ध उद्योजक श्री. अरुण बाळाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच समाजसेवक श्री. विठोबा नाईक, साईनाथ पाटील, अनिल पाटील, दिनेश पाटील, मयूर पाटील, सत्यवान पाटील, दिनेश हेंदर पाटील, जितेंद्र पाटील, जयेश पाटील, महेश पाटील यांचीही उपस्थिती लाभली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विशाखा घाग, सहशिक्षिका सुषमा रामदास पाटील, अंगणवाडी सेविका सौ. संजना संजय पाटील, मदतनीस सौ. मनीषा पाटील, सौ. शुभांगी पाटील, मयुरी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. विशाखा घाग यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहशिक्षिका सुषमा रामदास पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानाचे महत्व, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.हा
संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गाण्यांच्या नृत्याविष्कार वातावरणात आणि जल्लोषात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button