जिल्हा परिषद पालघर येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी


जिल्हा परिषद पालघर येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
पालघर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पालघर येथे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर तसेच जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. हसनाळकर यांनी जांभेकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेतील मोलाच्या योगदानाचे स्मरण केले. समाजप्रबोधनाच्या कार्यात त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.