Uncategorized

जिद्दीच्या जोरावर आदिवासी कन्या महाराष्ट्र सुरक्षा बलात; वेवजीच्या ज्योती धोडीचे दैदिप्यमान यश

जिद्दीच्या जोरावर आदिवासी कन्या महाराष्ट्र सुरक्षा बलात; वेवजीच्या ज्योती धोडीचे दैदिप्यमान यश


​तलासरी दि. १४(डॉ. दत्तात्रय शिंदे )
तालुक्यातील वेवजी काटील पाडा येथील कु. ज्योती बबला धोडी हिने आपल्या अंगी असलेल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘महाराष्ट्र सुरक्षा बल’ (MSF) मध्ये स्थान मिळवून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सोलापूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दहाव्या तुकडीचे खडतर प्रशिक्षण तिने नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, तिच्या या यशाने संपूर्ण आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
​ज्योती धोडी हिने हे यश मिळवण्यासाठी कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता, केवळ स्वतःचा सराव आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर ही निवड परीक्षा उत्तीर्ण केली. ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव असतानाही केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश खेचून आणता येते, हेच तिने सिद्ध करून दाखवले आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, स्वतःचे कुटुंब, गाव आणि संपूर्ण धोडीया समाजातून महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झालेली ज्योती ही पहिलीच महिला ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे ग्रामीण भागातील तरुण मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला असून, तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button