Uncategorized

नारी शक्ती पुरस्कार २०२६ ने दिपाली पारसकर यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव

नारी शक्ती पुरस्कार २०२६ ने दिपाली पारसकर यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव


मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील)

जागतिक महिला दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नारी शक्ती पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिपाली पारसकर यांना “नारीशक्ती पुरस्कार पत्रकारिता क्षेत्र ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला. महिलांनी घर व कार्यालय या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत समाजात आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळत असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

यावेळी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनतर्फे दिपाली पारसकर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या दिमाखदार सोहळ्याला पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला रविशेठ पाटील, रविशेठ पाटील,निलेश भोईर,अमर
ठाकूर,सुधीर पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या १६ महिलांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. मुनीर तांबोळी (राष्ट्रीय अध्यक्ष), विकास पाटील (जिल्हाध्यक्ष, रायगड) आणि अन्य पदाधिकारी यांचा समावेश होता.

कोट

मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “नारी शक्ती पुरस्कार २०२६” देऊन माझा सन्मान करण्यात आला. हा सन्मान पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिलाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, याचा मला अत्यंत आनंद व अभिमान वाटतो.
या सन्मानासाठी माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मुनीर सर तसेच मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे मनःपूर्वक आभार.
असे दिपाली पारसकर यांनी आपले भावनिक मत व्यक्त केले.

हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून पुढेही समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्याची ऊर्जा देणारा आहे असे सांगत
सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button