Uncategorized

केंद्र सरकारविरोधात पालघर जिल्हा कार्यालय, येथे पालघर जिल्हा काँग्रेस कमीटीचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण यशस्वी

केंद्र सरकारविरोधात पालघर जिल्हा कार्यालय, येथे पालघर जिल्हा काँग्रेस कमीटीचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण यशस्वी
१५ जानेवारी
पालघर ( एच लोखंंडे ) भारतीय राष्ट्रीय ✋काँग्रेसच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मार्गदर्शना अनुसार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामे, ज्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाला, ( अकुशल मजुरांना ) वर्षांतून किमान १०० दिवसाची, कायदेशीर कामाची हमी, आणि इतर विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील गंभीर समस्यांकडे केंद्र सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या लाक्षणिक उपोषण
आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालघरचे, श्री. सुभाष भागडे – निवासी उपजिल्हाधिकारी, व श्री. मल्लिकार्जुन – सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, यांची भेट घेऊन, मान्यवर यांच्या उपस्थितीत. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यामध्ये निवेदनात मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मनरेगा योजनेत पूर्वीप्रमाणे केंद्र सरकारचा ९० % टक्के व राज्य सरकारचा १० % टक्के असा निधीचा वाटा पुन्हा सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. सध्या या योजनेत केंद्राकडून ६० टक्के व राज्याकडून ४० टक्के अशी हिस्सेदारी केल्याने, पालघर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
पालघर जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवून देण्यात यावी. व सुमारे १५ हजार शेतकऱ्यांकडून तातडीने धान खरेदी करण्यात यावी, मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, बुलेट ट्रेन प्रकल्प व वाढवण बंदरगाह आदी मोठ्या प्रकल्पांन साठी लागणारी साधनसामग्री, यंत्रणा वाहतुकीमुळे, खराब झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
वाडा–मनोर महामार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या रस्त्यावरील कामात प्रथम एका बाजूचे डांबरीकरण करून साईड पट्टी तयार केल्यानंतरच, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्यात यावे, अशीही निवेदनात मागणी करण्यात आली.
हे आंदोलन श्री. प्रफुल्ल पाटील – पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रुफी भुरे, मधुकर चौधरी व अरविंद सिंग क्षत्रिय, वरिष्ठ पदाधिकारी लोकेश पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सीमा पोतदार, वरिष्ठ पदाधिकारी अविश राऊत, जिल्हा महासचिव रामप्रकाश निराला, ॲड. दीपक सावले, रोशन पाटील, नितांत चव्हाण, अशद चुनावाला, पालघर तालुका प्रभारी अध्यक्ष सिकंदर शेख, पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर, मनोर शहर अध्यक्ष रविश नाचन, आसिफ मेमन, रसिक भानुशाली, नईम चौधरी, किरण (अप्पा) पाटील, संदीप मेने, सानिक चव्हाण, शैला प्रसाद व दीपक पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button