Uncategorized

कोकण मराठी साहित्य परिषद पालघर शाखा आयोजित ‘मराठीचा पंधरवडा’ उत्साहात साजरा

कोकण मराठी साहित्य परिषद पालघर शाखा आयोजित ‘मराठीचा पंधरवडा’ उत्साहात साजरा
केळवेरोड, दि. ९ जानेवारी —
कोकण मराठी साहित्य परिषद, पालघर शाखा व विद्यावैभव विद्यालय, रावळे (केळवेरोड) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीचा पंधरवडा’ हा उपक्रम माध्यमिक शाळेत उत्साहात पार पडला. मराठी भाषेचे जतन, संवर्धन व विद्यार्थ्यांमध्ये भाषाभिमान जागवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी को.म.सा.प. पालघर शाखेच्या अध्यक्षा प्रा. स्मिता पाटील यांनी ‘मराठीचा पंधरवडा’ या विषयावर प्रास्ताविक करत उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर कोमसापच्या सदस्या सौ. निशा वर्तक यांनी ‘मराठीचे जतन आणि संवर्धन’ या विषयावर सखोल व प्रेरणादायी विचार मांडले.
कलाशिक्षक श्री. विनय पाटील सर यांनी प्रात्यक्षिकांसह सुलेखनाचे मार्गदर्शन केले. सुलेखनातून साकार केलेल्या विविध कलाकृती विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष दाखवत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण केली.
या कार्यक्रमासाठी कोमसाप कार्यकारिणी सदस्य श्री. गौरव राऊत व श्री. संजय पाटील मायखोपकर यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालय समिती व मुख्याध्यापक श्री. मनोहर किणी सर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल श्री. संजय पाटील मायखोपकर यांनी आभार मानले.
‘मराठीचा पंधरवडा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम, अभिमान आणि जाणीव निर्माण झाली असून हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button