Uncategorized

नगर परिषद पालघरमध्ये शिवसेनेचा निर्णायक डाव
उज्ज्वला केदार काळे यांची गटनेतेपदी नियुक्ती

नगर परिषद पालघरमध्ये शिवसेनेचा निर्णायक डाव
उज्ज्वला केदार काळे यांची गटनेतेपदी नियुक्ती
पालघर | प्रतिनिधी
नगर परिषद पालघरच्या अलीकडील निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्ष उज्ज्वला केदार काळे यांची शिवसेना गटनेतेपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नगर परिषदेत शिवसेनेची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली असून आगामी काळात आक्रमक आणि शिस्तबद्ध नेतृत्व पाहायला मिळणार आहे.
उज्ज्वला काळे या अनुभवी, स्पष्टवक्त्या आणि कणखर नेत्या म्हणून ओळखल्या जातात. नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी विकासकामांना गती देत प्रशासनावर मजबूत पकड ठेवली होती. त्याच पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नागरी प्रश्नांवर शिवसेनेची ठाम भूमिका मांडत नगर परिषदेत प्रभावी विरोध व निर्णायक भूमिका बजावली जाईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीमुळे पालघरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून शिवसेना अधिक आक्रमक पवित्र्यात दिसणार, हे निश्चित मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button