Uncategorized

इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी चे वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा.

इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी चे वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा.

सफाळे (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांच्या अंगभूत असणाऱ्या कलागुणांना वाव देणारा तथा संस्काराची जोपासना करणारा वार्षिक स्नेहसंम्मेलन कार्यक्रम ग्रा. वि. वि.व. मंडळ , लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट चे माजी अध्यक्ष डिस्ट्रिक्ट गव्हर्नर के. यल. परमार सर ह्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रुपाली भोईर ह्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अमित धनसुक पटेल सर आणि लायन नीलम सेथीया मॅडम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेंद्र किणी ह्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील’ नृत्य प्रकाराची झलक दाखवून भारतीय संस्कृतीचे दर्शन उपस्थीतांना घडवून आणले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट, मुलींवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध लढण्याची हिम्मत वाढविणारा अभिनय तसेच ज्या घरात असे आजी-आजोबांचा निवास त्या घरी होईल संस्कारांचा विकास त्या एकसंध् ठेवणाऱ्या कुटुंबांवर आधारित असलेला सुंदर अभिनय सादर करण्यात आला व महाभारता सारख्या विविध विषयांवरील कलाकृती विद्यार्थ्यांदवारे सादर करण्यात आल्या. त्याच प्रमाणे विद्‌याथ्यर्थ्यांनी केलेल्या नृत्यांनी तसेच कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी लायन मुकेश सेथिया सर, लायन जातीन कदम सेक्रेटरी ऑफ लायन्स क्लब सफाळे तथा दिनकर वर्तक सर फास्ट प्रेसिडेंट ऑफ लाइन्स क्लब सफारी आणि नवीन घरत सर मेंबर्स ऑफ लायन्स क्लब ऑफ सफाळे, हेही उपस्थित होते ग्रा.वि.वि.व.मंडळाचे कार्यवाह श्री. विश्वनाथ पाटील सर, सदस्य नितीन वर्तक तसेच ईएमएस चे सदस्य श्री. भरत चौधरी सर , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षका कु.मनस्वी राऊत आणि सौ.मेघना भोईर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्र‌माला विदयार्थी, पालक व ग्रामस्थांनी हजेरी लावली. मानली गावड हयांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button