Uncategorized

बांधघर ता.डहाणू, येथील कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

बांधघर ता.डहाणू, येथील कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
२८ डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) आदिवासी उन्नती मंडळाचे, मौजे बांधघर.तालुका -डहाणू जि.पालघर येथील कला – वाणिज्य – विज्ञान, कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थींचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक कला क्रिडा व तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादित करणारे विद्यार्थी यांचा दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनांचे औचित्य साधत क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे / संस्थेचे व कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री.राजन घरत सर – माजी मुख्याध्यापक ह.म.पं विद्यालय सफाळे ता.जि.पालघर यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थित प्रशस्तीपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आला.
या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभाला मान्यवर / प्रमुख पाहुणे म्हणून, जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जयवंत राऊत, संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री. भानुदास वैद्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिलजी यांनी उपस्थित, प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भारतीय सैनादलाचे सेवानिवृत्त सैनिक श्री.भानुदास वैद्य ( रा.सफाळा ) यांनी तरुण पिढीला सैन्यात भरती होण्यासाठी आवाहन केले. तसेच सैन्यात जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे, सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, आज देशाला तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे.
कार्यक्रमाचे यावेळी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजन घरत सर – माजी मुख्याध्यापक ह.म.प विद्यालय सफाळे ता. जि.पालघर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम आरोग्य, मेहनत, जिद्द, व कामात सातत्य ठेवून सचोटीने काम केले पाहिजे. आपणं प्राथमिक शाळेमध्ये अ, आ, इ, ई, शिकताना अ म्हणजे अभ्यास, आ म्हणजे आरोग्य, इ म्हणजे इमानदारीता, व दुसरा ई म्हणजे ईश्वर स्मरण. हे नेहमी लक्षात अत्यावश्यक आहे. आपल्या शालेय जीवनात मिळालेले हे बक्षीस आपल्याला कायम स्मरणात राहील. आपण मोठे झाल्यानंतर आपल्या शाळेच्या संस्थेला / शाळेला नक्कीच मोलाची मदत करतील अशी मला अपेक्षा आहे. आपल्या भारत देशामध्ये मोठी विद्वत्ता आहे.आणि परकीय देश त्या विद्वत्तेचा वापर करीत आहेत. सर्वात मोठी विद्वत्ता ( ज्ञान ) आपल्या ग्रामीण भागात आहे. आपल्या विद्वत्ता / ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी करावा असे.आवाहन श्री राजन घरत सरनी विद्यार्थ्यांना केले. आजचा तरुण वर्ग भरकटत चाललेला आहे त्याला नवी दिशा मिळण्यासाठी तरुणांनीच आपले कौशल्य पणाला लावले पाहिजे.यासाठी फार मोठ्यांचा आदर्श घेण्यापेक्षा आपल्या जवळपास असलेले आपल्या शाळेतील प्राध्यापक मंडळी, शिक्षक, आपले आई-वडील, आपल्यापेक्षा वयाने व ज्ञानाने मोठे असलेले व यशस्वी झालेले आपले भाऊ- बहिण यांचें मार्गदर्शन घेत. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपले महाविद्यालय हे फक्त खेळातच नव्हे तर शिक्षणात सुद्धा शंभर टक्के निकाल देऊन ग्रामीण भागात एक नवा अध्याय रचत आहे. याचा मला अभिमान वाटतो
जय हिंद जनजागृती संघाचे अध्यक्ष श्री. जयवंत राऊत कार्यमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रेमाची भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अरविंद शाळेचे प्राध्यापक यांनी केले. उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. कल्पेश जी गंगोडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button