वाणगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा.


वाणगाव (प्रतिनिधी)….7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीताच्या लेखनास 150 वर्षे पूर्ण होत आहेत; याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री जिव्या सोमा मशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगाव ता. डहाणू येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ते निवृत्त पर्यवेक्षक प्रा. संजय घरत हे होते. त्यांनी वंदे मातरम या गीताच्या लेखनास 150 वर्षाचा इतिहास सांगताना वंदे मातरम ची पार्श्वभूमी, वंदे मातरमचा अर्थ, वसुधैव कुटुंबकम, स्वतंत्र भारताचा ध्वज, आत्मनिर्भर भारत, वंदे मातरम प्रेरणेचा प्रवास, विकसित भारताची संकल्पना, स्वदेशी चळवळ अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय नामदेव भोई यांनी शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त शुभेच्छा देत देश प्रेम लक्षात घेऊन आपण सर्वांनी कर्तव्यनिष्ठेवर भर दिला पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीतांवर आधारित पथनाट्य सादर केले. तसेच प्रशिक्षणार्थी मुलींनी नृत्य देखील सादर केले. प्रेक्षकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बोईसर येथून नम्रता दिदींनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत हेमा दीदी, समीर भाई उपस्थित होते. वाणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक पठाण, तलाठी सोपान पवार, रसिका पाटील, भूषण महाला अजय बंजारा, श्रद्धा मुजलेकर, दहिसरच्या सरपंच अमिता धोदडे, पत्रकार शौकत शेख अनेक मान्यवर निमंत्रित, संस्थेतील निर्देशक, शिक्षक- शिक्षिका, ग्रामस्थ परिसरातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत बोकंद तसेच सूत्रसंचालन प्रशांत वडार, कल्याणी तळपडे व आभार चंदन बंजारा सरांनी मानले.