Uncategorized

ओझोन हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबचे उद्घाटन; पालघर क्रिटी केअर नर्सिंग होमचेही लोकार्पण

ओझोन हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबचे उद्घाटन; पालघर क्रिटी केअर नर्सिंग होमचेही लोकार्पण


पालघर(प्रतिनिधी ): पालघर शहरातील आरोग्य सुविधांना बळ देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
पालघर येथील ओझोन हॉस्पिटल येथे अत्याधुनिक कॅथलॅब विभागाचे उद्घाटन माननीय खासदार डॉ. हेमंतजी सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. या कॅथलॅबमुळे हृदयविकाराशी संबंधित तपासण्या व उपचार आता पालघरमध्येच उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याचबरोबर पालघरमधील पालघर क्रिटी केअर नर्सिंग होमचे उद्घाटन माननीय श्री. प्रवीण (दादा) राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. या नर्सिंग होममुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व तातडीची उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना माननीय डॉ. हेमंतजी विष्णु सवरा यांच्यासह अनेक मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, स्थानिक पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पालघर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचे स्वागत करत, नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button