लायन्स क्लब बॉम्बे वेस्टअर्पण सोहळा २०२५

लायन्स क्लब बॉम्बे वेस्ट
अर्पण सोहळा २०२५
आगरवाडी (प्रतिनिधी)लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट ह्यानी इंग्लिश मिडीयम स्कूल आगरवाडी साठी १०० खुर्च्या, मेटलिक नेमप्लेट (शाळेचे नाव), ५ कॉम्पुटर,व वर्गखोल्यासाठी सुमारे १८००००० च्यावर निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
तसेच लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट च्या अध्यक्षा नीलम सेथीया मॅडम यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली ५ गरीब विध्यार्थ्यांना रु. ३०००० ची स्कॉलरशिप दिली त्यांचे खूप खूप आभार.
डॉ.अस्मिता म्हात्रे, रूपा सावे, आणि सारिका सावे या तिघी मैत्रिणींनी आपली मैत्रीण कै. प्रतीक्षा भूषण राऊत हिच्या स्मृती प्रित्यर्थ दहावीला येणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये बक्षीस देऊ केले आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
इंग्रजी माध्यम शाळा कमिटीचे सदस्य श्री नंदन वर्तक सर यांनी कै. माणिक गोविंद वर्तक, कै. वासंती वासुदेव वर्तक, कै. कमल खंडेराव वर्तक ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि श्रीमती मालती हरिश्चंद्र वर्तक यांच्या सौजन्याने उत्तम खेळाडू ,अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि दोन अभ्यासू व्यक्तिमत्व असे एकूण चार पुरस्कार आणि रोख दोन हजार रुपये देण्यात आले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
त्यांच्याशी संपर्क करून देणगी मिळवल्याबद्धल श्री. महेंद्र किणी सर, श्री. पि. टी. पाटील सर आणि मुख्याध्यापिका सौ.रुपाली भोईर मॅडम ह्यांचेही खूप आभार.