Uncategorized

पायाभूत सुविधांसाठी १० लाखांपर्यंत अनुदान, २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

पायाभूत सुविधांसाठी १० लाखांपर्यंत अनुदान, २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

पालघर (प्रतिनिधी)दि २ फेब्रुवारी : बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण दिलासा दिला असून, पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रु. १० लाखांपर्यंत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दि. ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आणि ज्यामध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्य असलेल्या संस्थांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर योजना बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना भक्कम आधार देण्यासाठी राबविण्यात येत आहे.
सन २०२५-२६ साठी या योजनेअंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी दि. २७ जानेवारी २०२६ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले असून, पात्र संस्थांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या विहित नमुन्यात पायाभूत सुविधांसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
पात्र व इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, पालघर यांच्या कार्यालयात दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button