पालघर जेष्ठ नागरिक समन्वय समिती चे वतीने, सामाजिक कार्यकर्ते, डॉ. अॕड. निलेश राऊत यांचा सन्मान


पालघर जेष्ठ नागरिक समन्वय समिती चे वतीने, सामाजिक कार्यकर्ते, डॉ. अॕड. निलेश राऊत यांचा सन्मान
२ फेब्रुवारी
पालघर (एच लोखंंडे ) पालघर तालुक्यातील ममता विसावा, वात्सल्य या तीन जेष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीच्या वतीने ज्या महिन्यात वाढदिवस असेल त्या सदस्यांनचे वाढदिवस
महिन्याभराच्या शेवटी सर्व सदस्याचे वाढदिवस एकत्रित साजरे केले जातात. तसेच अनेक नवनवीन उपक्रम अनेक वर्षांपासून जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने व नागरिक संघ आणि समन्वय समिती द्वारे विविध उपक्रम, आणी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, सदस्यांचे व सामाजिक कार्यकर्ते – जेष्ठ नागरिक यांचे वाढदिवस, पालघर येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे आयोजित करून साजरे करण्यात येतात.
या अनुषंगाने दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी वाढदिवस असलेल्या सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड. डॉ. निलेश राऊत यांचा सुद्धा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचवेळी डॉ. अॕड. निलेश राऊत त्यांच्या सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी साठी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री.भगवान पामाले यांनी डॉ.निलेश राऊत यांचा गौरव करीत, सांगितले, आपणं पुढे वृद्ध होणारच आहोत.ज्येष्ठांची भावना ओळखून स्वतः सदस्य पद स्वीकारले आहे. व नेहमी जेष्ठ नागरिकांना मदत करीत असतात. तसेच या संस्थेला आणि इतर संस्थाना देखील सहकार्य करतात. एक युवा कार्यकर्ता असलेले निलेश राऊत हे स्वतः पुढाकार घेऊन कामे करतात, हेच पुढील खरे कार्यकर्ते आहेत. अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.नरेंद्र पाटील, खजिनदार श्री.प्रकाश पाटील यासह अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी श्री.निलेश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले, मी माझ्या परीने नेहमी आपल्या संस्थेच्या प्रत्येक कामात मला जमेल तशी यथायोग्य मदत करीत राहील, व आपल्याला सहकार्यासाठी आपला हक्कचा माणूस म्हणून मी नेहमीच उपलब्ध राहणार आहे. मी आपलाच एक घटक आहे.