इतिहासकार वा. सी. बेंद्रे इतिहास अकादमीचे पहिले अधिवेशन संपन्न.

इतिहासकार वा. सी. बेंद्रे इतिहास अकादमीचे पहिले अधिवेशन संपन्न.
संभाजीनगर
दि.१४(डॉ. दत्तात्रय शिंदे)
कै. वामनराव पितांबरे महाविद्यालय आणि जिजामाता कला महिला महाविद्यालय, पडेगांव, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककल्याणकारी वारसा या विषयावर बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद, इतिहासकार वा. सी. बेंद्रे इतिहास अकादमी पहिले अधिवेशन, पडेगाव छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वी संपन्न झाले.
उद्घाटन मा. विंग कमांडर टी आर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटक म्हणून मा.पुरुषोत्तमजी खेडेकर, संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ, प्रा.गजानन सानप व प्रा.अपर्णा पाटील एम.सी मेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, प्रा.गीतांजली बोराडे इतिहास विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्रा. डॉ. हरी जमाले, अध्यक्ष, श्री पुरोगामी शिक्षण, सांस्कृतिक व क्रिडा प्रसारक मंडळ, सावळदबारा, सचिव मा.सुजीत पितांबरे, प्रा.डॉ.विलास पाटील, अध्यक्ष, वा. सी. बेंद्रे इतिहास अकादमी बीजभाषक प्रतिइतिहासकार इंजि. चंद्रशेखर शिखरे (प्रख्यात लेखक, विचारवंत) प्रमुख अतिथी इंजी. डॉ.विजय घोघरे प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ, मा.धनंजय पाटील विभागीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ, इंजी. डॉ.नवनाथ घाडगे कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ, उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ हरी जमाले सरांनी केले. प्रा. विलास पाटील यांनी मराठा ही संकल्पना किती व्यापक आहे याचा ऊहापोह त्यांच्या भाषणातून केला. डॉ.गजानन सानप यांनी सदिच्छा मनोगत व्यक्त केले. तर बीजभाषक चंद्रशेखर शिखरे यांनी इतिहासाची मोडतोड न होऊ देता संदर्भासह मूळ इतिहास लेखन किती महत्त्वाचे असते यावर परखड भूमिका मांडली.
परिसंवाद सत्रात मराठ्यांचा इतिहास संशोधनाच्या संभाव्य संधी व दिशा अध्यक्ष प्रा.डॉ.रामभाऊ मुटकुळे, हिंगोली प्रमुख वक्ते प्रा.डॉ.लिलाधर पाटील, प्रा.डॉ.सतीश कदम यांनी मराठा इतिहासाला उजाळा दिला. मराठा साम्राज्याचे चलन यावर डॉ.आशुतोष पाटील यांनी चर्चा केली.
समारोप सत्र अध्यक्ष मा.इंजि. किशोरनाना हंबर्डे, अध्यक्ष, आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, बीड प्रमुख पाहुणे मा.प्रशांत अमृतकर, कुलसचिव, मा.प्रा.व्यंकटेश लांब, मा. प्राचार्य, जी.बी.पाटील, मा.अरविंद तेलवाडकर, प्रा.डॉ.सर्जेराव जिगे, प्राचार्य, भारत खंदारे, डॉ.योगीता होके पाटील, वैशालीताई कडू, जिजाऊ ब्रिगेड, इंजि. डी.एम. पाटील, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, प्रा.डॉ.संदेश वाघ मुंबई विद्यापीठ यांनी सदर परिषदेसाठी उपस्थिती दर्शवली. संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी १५० पेक्षा जास्त संशोधन पेपर पाठवून सहभागी झाले होते. निवडक पेपर चे वाचन करण्यात आले.
प्रा.डॉ.राहुल भालेराव पाटील सचिव, इति. वा. सी. बेंद्रे इतिहास अकादमी, संयोजक प्राचार्य, डॉ.ए.जी. नदाफ, कै. वामनराव पितांबरे महाविद्यालय, प्राचार्या डॉ. वंदना हरी जमाले पाटील जिजामाता कला महिला महाविद्यालय, छ. संभाजीनगर, प्रा.केतन डेकाटे, सचिव, स्थानिक संयोजन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.
परिषदेचे नियोजन, व्यवस्था प्रा. डॉ. हरी जमाले सर, अध्यक्ष, श्री पुरोगामी शिक्षण, सांस्कृतिक व क्रिडा प्रसारक मंडळ, सावळदबारा, यांनी केले होते. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सूत्रसंचालन डॉ.राहूल पाटील सौ.कडू मॅडम यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत केलेल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.