Uncategorized

विराथन खुर्द गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण

विराथन खुर्द गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण


सफाळे : (प्रतिनिधी)शिवजयंती निमित्त मौजे विराथन खुर्द (ता. पालघर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गावाच्या वेशीवर उभारण्यात आलेले हे आकर्षक प्रवेशद्वार सरपंच सौ. राजश्री सदानंद किणी व ग्रामपंचायत सदस्यांच्या सौजन्याने उभारण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती सुरेश तरे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. तसेच माकणे, मांडे-विठ्ठलवाडी, विराथन बुद्रुक, जलसार, टेमभीखोडावे, वेढी, नगावे, माकूनसार या गावांतील प्रतिनिधींसह मायखोप गावातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रये भोईर यांनीही उपस्थिती लावली.
उद्घाटनानंतर प्रवेशद्वारापासून जुन्या गावापर्यंत शिवजयंतीनिमित्त वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छोट्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारण्यात आलेले हे भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार शिवकालीन वास्तूंची आठवण करून देणारे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रवेशद्वाराच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावल्याबद्दल सरपंच सौ. राजश्री सदानंद किणी यांचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button