Uncategorized

सन्मान धवलारणींचा’ पारंपारिक आगरी कोळी धवलगीत स्पर्धा-२०२६ (पर्व-२ रे)

सन्मान धवलारणींचा’ पारंपारिक आगरी कोळी धवलगीत स्पर्धा-२०२६ (पर्व-२ रे)

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील )
८मार्च २०२६ रोजी ‘जागतिक महिला दिना’ निमित्त स्व.डी.आर.पाटील साहेब व स्व.भोलानाथ पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ “आगरी-कोळी संस्कृतीचा,सन्मान धवलारणींचा” पारंपारिक धवल गीत स्पर्धा -२०२६ (पर्व-२ रे) नवी मुंबईच्या नगरसेविका सौ.कविता चंद्रकांत पाटील आणि माथाडी नेता चंद्रकांत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम डॉ.सी.व्ही.सामंत विद्यालय,सेक्टर-२२,तुर्भेगांव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर धवलगीत स्पर्धेमध्ये नवी मुंबईमधील ३२ धवलारीन आणि खुल्या गटात नवी मुंबई बाहेरील ठिकाणाहून म्हणजे ठाणे,उरण,कल्याण,पनवेल,भिवंडी येथील ११ धवलारणींनी सहभाग नोंदवला होता. धवलगीत स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी ‘थांब थांब कासारा…’फेम सुप्रसिद्ध गायीका म्हणजे आगरी समाजातील गानकोकिळा असलेल्या चंद्रकला दासरी-कल्याण, ‘धवलारीन..एक आगरी पुरोहित’ या पुस्तकाचे लेखक तसेच सुप्रसिध्द कवी,विविध पुरस्कारांनी पुरस्कृत असलेले नवनाथ ठाकुर-खिडकाळी आणि संगीतकार,गीतकार आणि विविध धवलगीते व गाणे रेकाॕर्ड केलेले दया नाईक-भिवंडी हे तीन अभ्यासु परिक्षक लाभले होते.

  कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धूरा सौ.रंजना पाटील यांनी यशस्वीपणे सांभाळली. कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. स्पर्धेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमानी रंगत आणली.   स्पर्धेमध्ये नवीमुंबई मधून तीन क्रमांक आणि खुल्या गटातून तीन क्रमांक अशी सहा पारितोषिके काढण्यात आली.पारितोषिकांचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, शॉल व श्रीफळ, एक वस्त्र आणि रोख रक्कम असे होते.  तसेच सहभागी सर्वच धवलारणी आणि परिक्षक यांना आकर्षक सन्मानचिन्ह, शॉल- श्रीफळ, वस्त्र व रोख रक्कम देऊन सन्मानीत करण्यात आले.
    सदर कार्यक्रमाचे हे दुसरे पर्व होते. सदर कार्यक्रमाविषयी ठाणे,रायगड,पालघर व मुंबई या चारही जिल्ह्यांमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या धवलारणींना एक मंच मिळवून देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचे कौतुकास्पद कार्य चंद्रकांत पाटील आणि सौ.कविता पाटील हे दोघे दांपत्य करत आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. असे मत लेखक नवनाथ ठाकूर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button