Uncategorized

राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री Yogesh Kadam यांचे मोठे वक्तव्य

राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री Yogesh Kadam यांचे मोठे वक्तव्य


मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील | 10 मार्च 2026
इराण–इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्यावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थितीचा आढावा घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचा परिणाम देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड इंडस्ट्रीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत गॅसच्या मर्यादित पुरवठ्यामुळे सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तसेच पुढील तीन दिवस गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास मुंबईतील जवळपास ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खाद्य उद्योगासमोर मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री Yogesh Kadam यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांना घरगुती गॅसच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सरकारकडून गॅस वितरण कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button