पालघर ॲबी लाइटिंग ॲन्ड स्विचगिअर लिमिटेडमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा




पालघर ॲबी लाइटिंग ॲन्ड स्विचगिअर लिमिटेडमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पालघर (प्रतिनिधी): येथील ॲबी लाइटिंग ॲन्ड स्विचगिअर लिमिटेड कंपनीमध्ये दि. ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीतर्फे आयोजित या कार्यक्रमात महिला सशक्तीकरणाचा संदेश देत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर म्हणून ठिणगी सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता सुधीर माळवदे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते उपस्थित महिला कर्मचारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद व्यक्त केला. डॉ. स्मिता माळवदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिलांनी समाजात तसेच कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या विचारांनी उपस्थित महिलांना नवी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिला कर्मचारी व उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. अशा प्रकारे ॲबी लाइटिंग ॲन्ड स्विचगिअर लिमिटेड, पालघर येथे जागतिक महिला दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.