वाडा कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष आता कोकण विभाग फेडरेशनचे स्वीकृत संचालक

वाडा कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष आता कोकण विभाग फेडरेशनचे स्वीकृत संचालक
वाडा (प्रतिनिधी) : आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आणि सहकार्याने गेली १० वर्षे वाडा कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवणारे श्री. युवराज परशराम ठाकरे यांची आता कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाली आहे.
या निवडीमुळे सहकार क्षेत्रात कार्य करण्याची त्यांना अधिक व्यापक संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ संपूर्ण कोकण विभागातील सहकारी पतसंस्थांना होणार आहे. गेल्या दशकभरात त्यांनी वाडा कुणबी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या विविध समस्या सोडवून संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.
स्वीकृत संचालकपदाची जबाबदारी मिळाल्याने सहकार चळवळीतील ज्ञानात अधिक भर पडेल तसेच व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.