Uncategorized

आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे, पालघर विभाग

आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे, पालघर विभाग

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील )
आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ (मुंबई ठाणे पालघर विभाग) नियोजित २१ संघामध्ये
आई गावदेवी ४०+ मास्टर (भांडुप गाव ) आयोजित चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी आगरी कोळी चषक 2026 स्पर्धेचे आयोजन भांडुप गाव येथील भांडुपेश्वर कुंडा जवळील आदर्श क्रीडांगण येथे संपन्न झाले. सदर स्पर्धा एकूण मुंबई ठाणे पालघर विभागातील २१ गावातील संघांमध्ये भरवण्यात आली होती. सदर स्पर्धेचे भरवण्याचे मुख्य हेतू हा चाळीस वर्षे वरील खेळाडूंमधील जिद्द, चिकाटी दाखवण्याची तसेच आगरी कोळी समाजाला एकत्र बांधून ठेवण्या चा एका अतुल्य उपक्रम आहे.
सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक आई गावदेवी ४०+ भांडुप मास्टर
द्वितीय पारितोषिक चिखलादेवी मास्टर कोपरी ठाणे
तृतीय पारितोषिक श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर तृतीय पारितोषिक शेंडोबा कासारवडवली बी
चतुर्थ पारितोषिक श्रीराम बिलालपाडा मास्टर
चतुर्थ पारितोषिक श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए या संघाने मिळाले आहे. या प्रसंगी अनेक सर्व पक्षीय नेते, मंडळास मदत करणारे दानशूर व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button