Uncategorized

चारोटी (डहाणू) मध्ये शिवसेना चषक क्रिकेट सामान्यांचा जल्लोष, झाई संघ विजेता तर शिवशक्ती कासा संघ उपविजेता

चारोटी (डहाणू) मध्ये शिवसेना चषक क्रिकेट सामान्यांचा जल्लोष, झाई संघ विजेता तर शिवशक्ती कासा संघ उपविजेता

२३ मार्च
पालघर ( नितीन बोंबाडे ) चारोटी ता. डहाणू येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय क्रिकेट सामन्यात. स्पर्धांनी परिसरात अक्षरशः क्रिकेटचा थरार निर्माण केला. शिवसेना (शिंदे गट )डहाणू तालुका प्रमुख श्री. हेमंत धर्ममेहेर यांच्या नेतृत्वाखाली खुल्या गटासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अंतिम सामन्यात झाई संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत शिवशक्ती कासा संघावर मात करत विजेतेपद पटकावले. झाई संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या धावांचा यशस्वी पाठलाग करत 51 हजार रुपये रोख पारितोषिक आणि विजेता चषक आपल्या नावे केला.
उपविजेता म्हणून शिवशक्ती कासा संघानेही उल्लेखनीय कामगिरी करत 25 हजार रुपये रोख व चषक मिळवला. तिसऱ्या क्रमांकावर धाकटी डहाणू संघ राहिला, ज्याला 11 हजार रुपये व चषक देण्यात आला. तसेच आर्यन फायटर चारोटी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळासाठी हितेश शंकर पाटील याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे, माजी आमदार श्री. अमित घोडा, श्री.विठ्ठल जोशी, सचिन शिरसाड, विराज गडग, श्री. जानी वरठा, श्री. राहुल धानमेहेर, श्री. योगेश धानमेहेर यांच्यासह अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. तसेच श्री .राजेंद्र गावित, आमदार पालघर, सौ. वैदेही वाढाण – अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या सदस्या, शिवसेना उपनेते श्री.निलेश सांबरे, सौ. मनिषा निमकर – माजी आमदार,व माजी राज्यमंत्री, यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. चारोटीतील या क्रिकेट स्पर्धेने, खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करत क्रीडासंस्कृतीला चालना मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button