Uncategorized

जेएनपीएची विक्रमी कामगिरी; 8 दशलक्ष टीईयू व 100 दशलक्ष टन थ्रूपुट पार

जेएनपीएची विक्रमी कामगिरी; 8 दशलक्ष टीईयू व 100 दशलक्ष टन थ्रूपुट पार
मुंबई,(प्रतिनिधी )दि. 26 मार्च 2026 : देशातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जेएनपीएने (जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण) आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये 8 दशलक्ष टीईयू कंटेनर हाताळणीचा टप्पा पार करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. तसेच, एकूण 100 दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळणीचा टप्पाही गाठण्यात आला आहे.
या यशाचे श्रेय टर्मिनल ऑपरेटर व सर्व भागधारकांच्या संयुक्त प्रयत्नांना देण्यात आले. जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी ही कामगिरी व्यापार समुदायासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
बंदराच्या वाढत्या कामगिरीमुळे देशाच्या सागरी व्यापारात जेएनपीएची भूमिका अधिक मजबूत झाली असून, भविष्यात पायाभूत सुविधा व डिजिटल उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button