तारापूर एमआयडीसीत क्लोरीन वायू गळती; मोठी दुर्घटना टळली



तारापूर एमआयडीसीत क्लोरीन वायू गळती; मोठी दुर्घटना टळली
तारापूर(प्रतिनिधी), दि. २५ फेब्रुवारी २०२६ — तारापूर एमआयडीसी ता. जि. पालघर येथील श्री विनायक कॅमेक्स कंपनीच्या प्लॉट क्रमांक W-82 येथे आज क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना घडली. मात्र तत्परतेने बीए सेटचा वापर करून गळती नियंत्रणात आणण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गळतीची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. प्रशिक्षित पथकाने बीए सेटच्या साहाय्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक देशमुख साहेब, एमपीसीबीचे अधिकारी तसेच श्रीनिवास (DISH) उपस्थित होते. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत.