Uncategorized

विक्रमगड तालुक्यात कम्युनिस्ट पक्षाची नवीन तालुका कमिटीची निवड;शेतकऱ्यांसाठी नवी ताकद

विक्रमगड तालुक्यात कम्युनिस्ट पक्षाची नवीन तालुका कमिटीची निवड;शेतकऱ्यांसाठी नवी ताकद

विक्रमगड/प्रसाद भालेराव
भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) विक्रमगड तालुक्यातील पुन्हा नवनिर्वाचित तालुका कमिटीची घोषणा केली. या कमिटीची ध्येयधोरण शेतकरी-मजूरांच्या हक्कांसाठी ठाम लढा देणे आहे. यामध्ये कॉम्रेड.काशिनाथ कोकेरा यांची तालुका सेक्रेटरीपदी फेरनियुक्ती झाली असून, कॉम्रेड. प्रकाश भोये व कॉम्रेड.बंदेश वरठा यांची तालुका सहसेक्रेटरी पदावर नियुक्ती झाली असून तालुका सदस्य म्हणून कॉम्रेड.संतोष लिलका, कॉम्रेड.प्रकाश गिंभल,कॉम्रेड.मधुकर कुवरा,कॉम्रेड.अरुण भोवरे, कॉम्रेड.कृष्णा दिवा,कॉम्रेड.अरविंद बारात,
कॉम्रेड.बाबु वावरे,कॉम्रेड.दिपक चौधरी,
कॉम्रेड.बंदू गिंभल, कॉम्रेड.अमित केंद्रा,
कॉम्रेड.रमेश धिंडा,कॉम्रेड.शंकर वैजल,
कॉम्रेड.अरुण धिंडा,कॉम्रेड.निलम धिंडा,
कॉम्रेड.विजय मलावकर,कॉम्रेड.विश्राम गिंभल,कॉम्रेड.रुकेश खूताडे, कॉम्रेड.दिनेश भेकरे, कॉम्रेड.अतुल वरठा,कॉम्रेड.मिलका वरठा,कॉम्रेड. रविना भुरकुड ह्यांची तालुका कार्यकारिणी निवड झाली असून एकूण २३ सदस्यांची तालुका कमिटी वर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ही कमिटी तालुक्यातील शेतकरी-श्रमिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत राहील.
या वेळी पक्षाच्या वतीने अखिल भारतीय किसान संघटनेचीही नवीन तालुका कमिटी गठित करण्यात आली. किसान संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड. दिनेश भेकरे,तालुका उपाध्यक्ष कॉम्रेड.दीपक चौधरी, तालुका सचिव कॉम्रेड विजय मलावकर,तालुका खजिनदार कॉम्रेड.अरुण धिंडा यात ४ प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्षाची नवी लाट उभी राहणार आहे. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आणि जमिनीच्या प्रश्नांवर या कमिटीने आघाडी घेणार आहे.
ह्या दरम्यान पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड आदेश बनसोडे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ यांच्यासह शेकडो सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते. विक्रमगड च्या जनतेला नवीन पर्यंत देण्यासाठी पक्ष जोमाने काम करणार असल्याचे ग्वाही कॉम्रेड. काशिनाथ कोकेरा ह्यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button