भुसावळ : दुसखेडा फाटा परिसरात शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस संपन्न

भुसावळ : दुसखेडा फाटा परिसरात शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस संपन्न

भुसावळ तालुक्यातील दुसखेडा फाटा, अकलुद शिवार पाडळसे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कथेच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भगवान शिवाच्या महिम्याचे श्रवण केले.
या शिवमहापुराण कथेचे आयोजन मंगळवार दि. १० मार्च २०२६ ते सोमवार दि. १६ मार्च २०२६ दरम्यान करण्यात आले असून दररोज दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत कथा सादर केली जात आहे. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या ओजस्वी व प्रभावी कथनशैलीमुळे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळत आहे.
कथास्थळी आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांमधून मोठ्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी उपस्थित राहत आहेत.
आगामी दिवसांमध्येही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रिपोर्टर : विशाल दांडगे, दुसखेडा