Uncategorized

कांदरवाडी (ता. डहाणू) येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतिगृहाला आग; ८७ विद्यार्थिनी सुरक्षित

कांदरवाडी (ता. डहाणू) येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतिगृहाला आग; ८७ विद्यार्थिनी सुरक्षित


डहाणू, दि. ५ मार्च
डहाणू तालुक्यातील कांदरवाडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतिगृहाला आज सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. वसतिगृहात त्या वेळी एकूण ८७ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सुदैवाने सर्व विद्यार्थिनींना तत्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेची माहिती शिक्षिका चित्रा चौगुले यांनी प्रशासनाला दिली. घटनेनंतर तातडीने डहाणू अग्निशमन दल यांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी ६.०३ वाजता अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, विद्यार्थिनी सुरक्षित असल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button