कॉ.गोदावरी शामराव परूळेकर महाविद्यालयात ” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंबेडकर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम साजरा “


कॉ.गोदावरी शामराव परूळेकर महाविद्यालयात ” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंबेडकर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम साजरा “
तलासरी (प्रतिनिधी)
दिनांक: 14 एप्रिल 2026
आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ.गोदावरी शामराव परूळेकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तसेच डॉ. बी ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त " *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांविषयी एक दिवसीय परिसंवाद*" आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलन , डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमापूजनाने व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए.राजपूत हे अध्यक्ष म्हणून तर महाविद्यालयाचे उपप्रचार्य आर. एन. पवार, डॉ. वैभव माने, ग्रंथपाल अर्जुन होन हे अतिथी म्हणुन तसेच महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक महेश माळवदकर, सहा. प्रा. भास्कर गोतीस हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत. त्याचबरोबर सर्व सहाय्यक प्राध्यापकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी देखील उपस्थित होते.
सर्वप्रथम वाणिज्य शाखेचे सहा.प्रा. महेश माळवदकर यांनी भारताच्या आधुनिकतेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्या विविध कार्याचा आढावा मांडला. त्यात त्यांनी बाह्य अर्थलाभ, अंतर्गत अर्थलाभ,सुवर्ण चलन पद्धत, सुवर्णमान विनिमय, भारतीय चलनांचा विनिमय दर, हिंदू कोड बिलमुळे महिलांना पुरुषाबरोबरीचे अधिकार या बाबासाहेबांच्या कार्याच्या घटना व योगदानाचे वर्णन त्यांनी केले .अशा बरेच श्रमविभाजन ,जातीव्यवस्था आणि त्यामुळे होणाऱ्या समाजाच्या आर्थिक आजारांचे पैलू व ह्या विरोधात बाबासाहेबांनी केलेले कार्य व्यक्त केले आणि औद्योगिक पायाभरणी केलेल्या कार्याचे मार्गदर्शन देखील केले.
त्यानंतर सहा. प्रा. भास्कर गोतीस यांनी बाबासाहेब यांचे धार्मिक्तेवर असणारे अलौकिक विचार, स्पष्टता, वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर संवाद साधला.तसेच बाबासाहेब यांना भारतरत्न, विश्वरत्न, ज्ञानाचा सागर, युगपुरुष, महापुरुष असं का म्हटलं जातं यांचे उदाहरण देऊन बाबासाहेबांची महानता स्पष्ट केली.शिक्षकतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ तशेच बाबासाहेबाच्या अनेक चळवळीतील विचारसरणीचे विचारांचे या सवांदातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
सदर परिसंवादाअंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .बी.ए. राजपूत यांनी अध्यक्ष भाषणातून बाबासाहेब यांचे शिक्षण क्षेत्रातील महत्त्व तसेच शिक्षण हे मूल्याधिष्ट असावे जेणेकरून समाजातील असमानता, अस्पर्शता कमी करून समाजाची प्रगती होईल असा मोलाचा संदेश दिला तसेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजेच शिक्षण घेऊन वैचारिक सक्षम व्हा, विधायक कामासाठी संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा असा बाबासाहेबांच्या जयंतीदिनीनिमित्त त्यांच्या मुलमंत्राचा अर्थबोधाचे प्रतिपादन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व सहाय्यक प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,कार्यालायीन कर्मचारी व महाविद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता पाटील आणि आभार प्रदर्शन सहा. प्राध्यापिका सुजाता गावीत यांनी केले.कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली.