Uncategorized

ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात; किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणावर भर

ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात; किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणावर भर


पालघर (प्रतिनिधी) : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेची प्रभावी सुरुवात दिनांक २८ मार्च रोजी ऐना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. या मोहिमेमुळे किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी तसेच वसई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. रानशेत (कोंपाडा) येथील १४ वर्षीय हर्षला वंशा काठ्या हिला LHV निलिमा उराडे यांच्या हस्ते HPV लस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी मुलीचे पालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे पालकांचा विश्वास व सहभाग अधोरेखित झाला.
कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा पाटील यांनी HPV संसर्ग व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी लसीचे महत्त्व, सुरक्षितता तसेच भविष्यातील आरोग्य संरक्षणातील भूमिका याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
तसेच १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींच्या पालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत HPV लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली व पालक तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
किशोरवयीन मुलींमध्ये HPV लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करून भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button