पालघर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य निधी संकलन अभियान


पालघर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य निधी संकलन अभियान
पालघर : (प्रतिनिधी)पालघर तालुक्यात महसूल विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य निधी संकलन अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अभियानात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने तालुक्यात विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत महसूल विभागाकडून गावागावात जाऊन जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून निधी संकलनाला हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी तसेच इतर कर्मचारी यामध्ये सक्रियपणे काम करत आहेत.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने शिबिरे घेण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागातही उपक्रमाबाबत जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.