स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे ‘कोकणरत्न’ पदवी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन!

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे ‘कोकणरत्न’ पदवी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन!
मुंबई प्रतिनिधी :
(सतीश पाटील)
स्वतंत्र कोकण विकास अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या कोकणरत्न या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेख सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. कोकण सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधन प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असून यंदाच्या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले आहे.हा भव्य स्वाभिमान सोहळा उद्या शनिवार, दिनांक :13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मुंबई पत्रकार भवन आझाद मैदानाजवळ मुंबई येथे स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष :श्री संजय कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे यावेळी कोकण रत्न पदवीचे वितरण अध्यक्षांच्या हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक: सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई अध्यक्ष: श्री धनंजय कुवेस्कर, खजिनदार: श्री राजेंद्र सुर्वे,नेते :श्री सुभाष राणे आणि प्रमुख सल्लागार: श्री दिलीप लाड यांच्या विशेष योगदान लाभले आहे स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा हा उपक्रम कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.