Uncategorized

तलासरीत २६ वी माधव कथाकथन माला संपन्न.

तलासरीत २६ वी माधव कथाकथन माला संपन्न
तलासरी दि. १३(डॉ. दत्तात्रय शिंदे)

छत्रपती शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालय तलासरी व विश्व हिंदू परिषद तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य माधव कथाकथन माला तलासरी येथे दि.१० ते १२ डिसेंबर दरम्यान उत्साहामध्ये संपन्न झाली. दि. १० डिसेंबर रोजी माधव कथाकथन मालेचे पहिले पुष्प गुंफण्याचा मान मा .संतोषजी भणगे सर मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ (कोकण प्रांत सचिव विद्याभारती) यांना मिळाला वंदे मातरम या गीताची गाथा विद्यार्थ्यांना गोष्टी रुपात सांगितली तर भगवान बिरसा मुंडा याचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर कथा रूपात सांगितला .परमवीर चक्र विजेता योगेंद्र यादव यांचा कारगिल युद्धातील पराक्रमाचा थरार विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला .
दि. ११डिसेंबर या दिवशी कथाकथन मालेचे दुसरे पुष्प गुंफण्याचा मान ज्येष्ठ साहित्यिक ,लेखक ,कवी महाराष्ट्र भूषण असे प्रवीणजी दवणे सर यांना मिळाला. शौर्य मुलांच्या कथा यामध्ये नाईट कॉलेजला शिकणारा विद्यार्थी, समुद्र पाहण्यासाठी जिद्द करणारा विद्यार्थी ,लता मंगेशकर यांची कथा, इस्त्री करणारी मुलगी अशा जिद्दी विद्यार्थ्यांच्या कथा प्रवीणजी दवणे सरांनी कथा रूपात सादर केल्या .शाळेतील शिक्षकांशी संवाद साधून आजचा शिक्षक कसा असावा याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन व काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. आपल्या संस्थेच्या व शाळेच्या कामाबद्दल मनापासून प्रवीण दवणे सरांनी कौतुक केले. दि. १२ डिसेंबर रोजी कथाकथन मालेचे तिसरे पुष्प गुंफण्याचा मान विवेकानंद संकुल सानपाडा शाळेचे मुख्याध्यापक विलास वाव्हळ सर यांना मिळाला सरांनी महाभारतातील कर्ण त्यांचा जन्म व मृत्यू याचा थरार विद्यार्थ्यांसमोर गोष्टी रुपात सादर केला सरांची कथा एक तास विद्यार्थी व सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते सदर कथाकथन मालेचे सूत्रसंचालन स्वागत परिचय ,आभार, शाळेतील विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धनगर सर, सहशिक्षक पाटील सर, विश्व हिंदू परिषद कार्यालय प्रमुख जयेश दादा यांनी अनुक्रमे सादर केले.सदर कार्यक्रमाला शाळेच्या परिसरातील पाच शाळांचे विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ज्ञानेश्वर पाटील सर, ऋतुजा गवस मॅडम, सानप सर आदी मान्यवर उपस्थित होते. कथाकथन मालेचे हे २६ वे वर्षे होते मुलांनी कथाकथनाचा मनमुराद आनंद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button