कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर वरीष्ठ महाविद्यालय तलासरी येथे क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन:



कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर वरीष्ठ महाविद्यालय तलासरी येथे क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन:
तलासरी (प्रतिनिधी)
कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर वरीष्ठ महाविद्यालयात दिनांक 10/12/2025 ते 16/12/2025 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी प्रगती मंडळ तलासरी संस्थेचे सचिव कॉम्रेड श्री. रुपेश राणे सर, व संचालक कॉम्रेड श्री. संदिप वावरे सर यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान राजपूत सर होते.
क्रीडा सप्ताहाची सुरवात श्री राणे सर व प्राचार्य राजपूत सर यांनी बॅडमिंटन खेळून केली.
कबड्डी स्पर्धेची सुरवात संचालक श्री संदिप वावरे सर व प्राचार्य राजपूत सर यांनी श्रीफळ वाढून केली. व खोखो स्पर्धेची सुरवात संस्थेचे सहसचिव श्री. विजय खुलात यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली.
क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, 200 मी., 400 मी. धावणे,गोळाफेक, थाळीफेक, कॅरम, बुद्धीबळ आदी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व खेळाडू वृत्तीने सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
स्पर्धांचे आयोजन प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागा मार्फत करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याचे कौतुक करून क्रीडा व शिक्षण यांचा समतोल साधण्याचे महत्त्व सांगितले.
क्रीडा सप्ताहाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
क्रिडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मा. प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले व क्रिडा विभाग, सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.