टेंभोडे प्रभाग क्रमांक ८ मध्ये ठाकरे गटाचा झेंडा
राहुल पाटील व राधा जितेंद्र पामाळे (मानकामे) यांचा विजय


टेंभोडे प्रभाग क्रमांक ८ मध्ये ठाकरे गटाचा झेंडा
राहुल पाटील व राधा जितेंद्र पामाळे (मानकामे) यांचा विजय
पालघर,(प्रतिनिधी) दि. — :२१ पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत टेंभोडे प्रभाग क्रमांक ८ मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील व राधा जितेंद्र पामाळे (मानकामे) हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. या दुहेरी विजयामुळे टेंभोडे परिसरात ठाकरे गटाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
प्रभाग क्रमांक ८ अ मधून राधा जितेंद्र पामाळे (मानकामे) तर ८ ब मधून राहुल पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत विश्वासार्ह विजय मिळवला. प्रचारादरम्यान नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख भूमिका मांडण्यात आली होती. त्याला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
विजयानंतर समर्थकांनी फटाके फोडून व जल्लोष करत आनंद व्यक्त केला. निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी टेंभोडे परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा सुधारण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले आहे.
या विजयामुळे पालघर नगर परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उपस्थिती अधिक मजबूत झाली असून आगामी काळात नगर परिषदेच्या कामकाजात सक्रिय भूमिका बजावली जाईल, अशी प्रतिक्रिया पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.