Uncategorized

येणाऱ्या पं समिती/ जि.परिषद निवडणुकीत तरूण, होतकरू सामाजिक कार्यकर्ते यांना संधी मिळावीअॕड.निलेश रमेश राऊत

येणाऱ्या पं समिती/ जि.परिषद निवडणुकीत तरूण, होतकरू सामाजिक कार्यकर्ते यांना संधी मिळावी
अॕड.निलेश रमेश राऊत
१४ डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) समाजासाठी आणि स्थानिक गोरगरीब जनतेसाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याद्वारे समाजात आणि स्थानिक शेतकरी, मच्छीमार, कामगार, व्यवसायिक, विद्यार्थी यांना त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांनी मदतीला धावून जाऊन. त्यांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी खरोखरच प्रयत्न करणारे कार्यकर्त्यांना येणाऱ्या पंचायत समिती / जिल्हा परिषद निवडणुकीत संधी मिळावी असे सामाजिक कार्यकर्ते अॕड. डॉ. निलेश राऊत यांचे सांगणे आहे
कारण राजकीय कार्यकर्ता हा पक्षीय काम करता करता समाजाशी आपली नाळ जुळवतो.समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत सर्वत्र काम करीत असतो. परंतु ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यकर्त्यांना निवडणुकीत प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते.आणि चमकू आणि शाईन मारणाऱ्या तो, कार्यकर्ता असो नसो त्याला निवडणुकीत तिकीट दिले जाते. यामुळे नव्या दमाच्या प्रत्यक्ष मैदानात उतरून विविध क्षेत्रात कामकरणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड होते. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्रिडा आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवीन्याची संधी मिळाली पाहिजेत, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ.निलेश राऊत यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले .
कारण नवीन दमाचे कार्यकर्ते मोठ्या आशेने काम करीत असतात. त्याच बरोबर समाजाच्या प्रत्येक घटकासोबत सामाजिक कार्य द्वारे लोकांसोबत सतत संपर्कात असतात. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत आपले काम करतात. मात्र अशा कार्यकर्त्यांना बरेचदा ऐन निवडणुकीत संधी नाकारत हवशे नवशे आणि गौशे यांना संधी दिली जाते हे योग्य नाही. प्रत्येक कार्यकर्ता कधीतरी निवडणुकी साठी संधी मिळेल या आशेत काम करतात. त्यांना देखील प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूकीत यांचे भाग्य उजळण्या साठी मदत केली पाहिजे. असे अॕड. निलेश राऊत यानी प्रांजळपणे आपले मत बोलताना व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button