Uncategorized

ठाणे वाहतूक उपयुक्तालय मार्फत आयोजित आरएसपी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद….
राष्ट्रीय पातळीवर ठाणे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे उद्दिष्ट — उपायुक्त पंकज शिरसाट

ठाणे वाहतूक उपयुक्तालय मार्फत आयोजित आरएसपी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद….
राष्ट्रीय पातळीवर ठाणे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे उद्दिष्ट — उपायुक्त पंकज शिरसाट

ठाणे(स्व.रा.तो): शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती वाढावी आणि अपघातमुक्त समाज घडावा या उद्देशाने ठाणे वाहतूक उपयुक्तालयाच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या आरएसपी (रोड सेफ्टी पेट्रोल) प्रशिक्षण कार्यशाळेला शुक्रवार दिनांक५/१२/२०२५ रोजी
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उपायुक्त शिरसाट म्हणाले की, “ठाणे जिल्ह्याच्या आरएसपी पथकाच्या कार्याची नोंद राष्ट्रीय स्तरावर व्हावी यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील,” असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
प्रशिक्षणाचा पहिला टप्पा तीन हात नाका, एलबीएस मार्ग, ठाणे (प.) येथील वाहतूक नियंत्रण कक्षात पार पडला.
विभागीय समन्वय अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांनी ‘ट्रॅफिक सेन्स’, रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण या विषयांची विद्यार्थ्यांमध्ये असलेली आवश्यकता व महत्त्व स्पष्ट केले.
तसेच कल्याण-डोंबिवली जिल्हा समन्वय अधिकारी अनंत किनगे यांनी आरएसपी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सर्व शिक्षक-अधिकाऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली.
दुपारच्या सत्रात निवृत्त बांधकाम अभियंता राम कनिकर यांनी पीपीटीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व अभ्यासले व प्रशिक्षणार्थींना व्हिडिओ स्क्रिप्टद्वारे पथनाट्य सादर करून मनोरंजनासह माहिती दिली. अपघात टाळण्यासाठी अनुसरावयाच्या उपाययोजना तसेच वाहनांच्या तांत्रिक तपासणीचे महत्त्व त्यांनी उलगडले.
आरोग्य विषयक सत्रात डॉ. मुकेश पांडे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन सीपीआर देण्याची योग्य पद्धत, खबरदारी आणि काय करू नये याचे मार्गदर्शन केले. तसेच ‘कॉरग्नेशन ट्रेनिंग कंपनी’च्या शेरॉन मॅडम व जानवी भोसले यांनी अपघातग्रस्तांना प्राथमिक मदत कशी करावी याचे प्रदर्शन केले.तिसऱ्या सत्रात वाहतूक पी.आय .मोतीराम धनगर यांनी मैदानावरील ड्रिल प्रशिक्षण घेतले. शिक्षक-अधिकाऱ्यांना गणवेश, मिरवणूक आणि मैदानी नियमावली समजावून सांगितली.
त्यामुळे या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा आर एस पी चे प्रसिद्धी प्रमुख, डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, प्रशांत भामरे (उपाध्यक्ष – विद्यासेवक पतपेढी), मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील, आम्रपाली विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण लोंढे यांचा समावेश होता.
आरएसपी युनिटचे मार्गदर्शक समाजसेवक माणिक पाटील तसेच पीआय युवराज सरनोबत व ॲडमिनिस्ट्रेटर चाबुकसर मेजर यांनी प्रशिक्षणाच्या उत्तम नियोजनात मोलाची भूमिका बजावली आहे.
समन्वयनात बाळा साठे, सतीश पाटील आणि प्रा. बबन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.या
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद शेलकर (उपजिल्हा समादेशक) यांनी केले.
ठाण्यात राबविण्यात येणारा हा उपक्रम आरएसपी पथक अधिक सक्षम बनवण्यासोबतच जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा जनजागृतीस नवे बळ देणारा ठरत असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button