Uncategorized

कोकण सरस महोत्सवात’ महिलांचा विक्रीचा विक्रम; ५ दिवसांत १.१० कोटींची उलाढाल

कोकण सरस महोत्सवात’ महिलांचा विक्रीचा विक्रम; ५ दिवसांत १.१० कोटींची उलाढाल


विरार(प्रतिनिधी), दि. — १२ ते १६ मार्च दरम्यान विरार येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण विभागीय सरस महोत्सव २०२६’ ने ग्रामीण महिला स्वयंसहायता बचत गटांच्या कर्तृत्वाला भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. अवघ्या पाच दिवसांत जिल्हा परिषद पालघर आणि वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल १ कोटी १० लाख ६४० रुपयांची उलाढाल झाली असून या महोत्सवाने महिला सक्षमीकरणाला नवी दिशा दिली आहे.
Maharashtra State Rural Livelihoods Mission (उमेद) अंतर्गत जिल्हा परिषद पालघरमार्फत ८९ लाख १२ हजार २० रुपये, तर Vasai–Virar City Municipal Corporation च्या (NULM) माध्यमातून २० लाख ८८ हजार ६२० रुपये इतकी विक्री नोंदविण्यात आली. दोन्हींची एकत्रित विक्री १,१०,००,६४० रुपये झाली. महोत्सवाच्या उद्घाटनावेळी Vijay Suryavanshi यांनी महिला बचत गट कोटीचा टप्पा पार करतील असा व्यक्त केलेला विश्वास महिलांनी प्रत्यक्षात उतरवत उल्लेखनीय कामगिरी केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी Manoj Ranade, अप्पर आयुक्त (विकास) Manik Dive तसेच प्रकल्प संचालिका Dr. Rupali Satpute यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा समारोप सोहळा संपन्न झाला.
महोत्सवातील विविध स्टॉल्समध्ये ग्रामीण महिलांनी सादर केलेले मसाले, घरगुती खाद्यपदार्थ, पापड, लोणची, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, आर्टिफिशियल ज्वेलरी, बांबू व लाकडी उत्पादने, फुले-तोराण तसेच विविध गृहउपयोगी वस्तूंना ग्राहकांकडून मोठी मागणी मिळाली. अनेक बचत गटांनी उत्कृष्ट मांडणी व विक्रीत आघाडी घेत विशेष ठसा उमटवला.
या महोत्सवातून अनेक महिला बचत गटांना नव्या व्यावसायिक संधीही उपलब्ध झाल्या. वाडा कोलम तांदूळ, बेसन, शेवया तसेच मोरिंगा पावडर या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळाल्या. तसेच DMart चे व्यवस्थापक नायडू यांनी महोत्सवाला भेट देऊन विविध उत्पादनांची पाहणी केली.
शहरी गटांमध्ये पांचाळ बचत गट, तुळजाई बचत गट आणि रुचिरा बचत गट यांनी सर्वाधिक विक्री केली, तर ग्रामीण गटांमध्ये श्री. स्मरण स्वयं सहाय्यक समूह (पालघर), माऊली स्वयंसहाय्यक समूह (विक्रमगड) आणि साईकृपा स्वयंसहाय्यक समूह (वाडा) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. उत्कृष्ट मांडणीसाठी काही बचत गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महोत्सवाला आमदार Sneha Dubey तसेच आमदार Rajan Naik यांनी भेट देऊन महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महापौर Ajiv Patil, जिल्हाधिकारी Dr. Indurani Jakhad आणि महापालिका आयुक्त Dr. Manoj Kumar Suryavanshi यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मनोज रानडे यांनी “सरस महोत्सव हा ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे,” असे प्रतिपादन केले. तर डॉ. माणिक दिवे यांनी “अशा व्यासपीठांमुळे ग्रामीण महिलांमधील उद्योजकतेला नवे बळ मिळते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते,” असे मत व्यक्त केले.
या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची, आपली उत्पादने सादर करण्याची आणि मोठ्या प्रमाणात विक्री करण्याची संधी मिळाली. कोटीहून अधिक विक्रीचा टप्पा पार करत महिलांनी आपल्या कष्टाचे चीज करून दाखवले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी आभार प्रदर्शन करून महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button