Uncategorized

कार्यालयीन सेवेतून प्रबंधकपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास : सुप्रिया उराडे यांची सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रबंधकपदी नियुक्ती

कार्यालयीन सेवेतून प्रबंधकपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास : सुप्रिया उराडे यांची सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रबंधकपदी नियुक्ती
पालघर (प्रतिनिधी) :
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक सेविका सुप्रिया उराडे यांची प्रबंधकपदी बढती देत नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र जोरदार स्वागत व कौतुक होत आहे. तब्बल ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी केलेल्या निस्वार्थ, संवेदनशील आणि विद्यार्थीकेंद्रित कार्याची ही योग्य दखल असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सेवाकाळात कोणत्याही गरीब, अपंग अथवा होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी त्यांनी नेहमीच विशेष काळजी घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेतील अडचणी सोडवणे, नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन करणे, जातिचे दाखले मिळवून देण्यासाठी मदत, तसेच गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देणे अशा असंख्य कामांमुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये ‘आधारवड’ म्हणून ओळखल्या जात होत्या.
विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या वतीने त्यांना ‘नारी रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. आपल्या कार्यातून त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे नावही राज्यस्तरावर उज्वल केले आहे.
त्यांच्या या दीर्घ, प्रामाणिक आणि सेवाभावी कार्याची दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने त्यांना प्रबंधकपदी नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गतिमान व संवेदनशील दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सुप्रिया उराडे यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button