Uncategorized

चायनीज मांजा, ( नायलॉन मांजा) विक्री – खरेदी व वापरावर कायद्याने बंदी, गुन्हा दाखल होऊ शकतो, सफाळे पो.ठाणे

चायनीज मांजा, ( नायलॉन मांजा) विक्री – खरेदी व वापरावर कायद्याने बंदी, गुन्हा दाखल होऊ शकतो, सफाळे पो.ठाणे
२० डिसेंबर
सफाळे ( एच लोखंंडे ) चायनीज मांजा – नायलॉन मांजा म्हणजे मृत्युचा सापळा. हा अत्यंत धारदार आणि जीवघेणा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्याची विक्री, खरेदी किंवा वापर करताना आढळून आल्यास किंवा मिळून आला असताना. सदर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी यासाठी निर्देश दिले आहेत. यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, मोठा दंड (१ लाख रुपये), ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि MCOCA अंतर्गत कारवाई होऊ शकते, तसेच अल्पवयीन मुलांनी वापरल्यास पालकांना जबाबदार धरले जाते, तरीही मकरसंक्रांतीच्या काळात अनेक ठिकाणी त्याची विक्री आणि वापर सुरू असल्याने पोलीस विशेष मोहीम राबवून कारवाई करत आहेत,
पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरावर बंदीची कारणे, १) हा मांजा अत्यंत धारदार असल्याने 🦅🦉पक्षी, मानव 🛵 🏍️ (विशेषतः दुचाकीस्वार) यांच्या गळ्याला किंवा शरीराला गंभीर इजा होऊन मृत्यू होऊ शकतो. २) हा मांजा लवकर तुटत नाही आणि पर्यावरणाचे नुकसान करतो, तसेच नायलॉन मांजा मुळे वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित होतो.
या अनुषंगाने भारतीय दंड संहिता कलम अंतर्गत कारवाई करण्यात येईल १)विक्री आणि वापर: पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. २) नायलॉन मांजामुळे मृत्यू झाल्यास, थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. ३) अल्पवयीन मुले वापरताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. ४) MCOCA: काही ठिकाणी MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचीही तरतूद आहे.
शासनाने बंदी घातली असली तरी, अनेक विक्रेते आणि साठेबाज छुपेपणाने त्याची विक्री करतात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी आप आपल्या माध्यमातून नायलॉन मांजा वापर आणि दुष्परिणाम यांवर जनजागृती करीत आणि कायदेशीर कारवाई करीत आहेत.
सफाळे पोलिस ठाणे ता. जि. पालघर प्रभारी अधिकारी अधिकारी श्री दत्ता शेळके सपोंनी याचे जनतेला आवाहन करीत आहे.पतंग उडविण्यासाठी फक्त सुती (Cotton) मांजा वापरावा व आपल्या पतंगोत्सव / मकरसंक्रांत उत्सवांचा आनंद लुटावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button