Uncategorized

पालघरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘सूर पहाटेचे’ व शोभायात्रेचे आयोजन

पालघरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘सूर पहाटेचे’ व शोभायात्रेचे आयोजन


पालघर : (प्रतिनिधी)भारतीय हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पालघरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार भारती, पालघर यांच्या पुढाकाराने गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ‘सूर पहाटेचे’ या संगीतमय कार्यक्रमासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम माहिम रोडवरील श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे पहाटे ६.०० ते सकाळी ७.३० या वेळेत पार पडणार आहे. या कार्यक्रमात ‘स्टार प्रवाह’वरील छोटे उस्ताद फेम गायक प्रथम पाटील यांच्यासह संजय महाजन व जगदीश भारद्वाज हे गायक आपली सुरेल मैफल सादर करणार आहेत. तसेच तबल्यावर राहुल चंपानेकर, संवादिनीवर अंकुश घरत साथ देणार असून कार्यक्रमाचे निवेदन प्रीती कल्पेश पाटील करणार आहेत.
त्यानंतर गुढीपाडवा शोभायात्रा मंडळ व संस्कार भारती पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७.३० वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा श्री लक्ष्मी-नारायण मंदिर येथून सुरू होऊन हुतात्मा स्मारक येथे समाप्त होणार आहे.
पालघरमधील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवावे व नववर्षाचे स्वागत उत्साहात करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन दिनेश तारखी व कल्पेश पाटील यांनी केले असून विशेष सहकार्य जयेश आहवाड, सागर पाटील, मनीष पिंपरकर आणि सागर घरत यांचे लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button